🙏बंधू आणि भगिनींनो,🙏

मुंबईहुन महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांसाठी फक्त star Air ची विमान वाहतुक सेवा कार्यान्वित आहे. SBT मध्ये Star Air चा पर्याय उपलब्द नसल्यामुळे on/ off करणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. Petroleum Employees Union च्या सतत च्या पाठपुराव्याला यश आले असुन Star Air चा बुकींग option SBT मध्ये उपलब्द झाला आहे आणि लवकरच SBT च्या site च्या upgradation नंतर तो Option site वर दिसु लागेल व महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून , जिथे फक्त star Air ची सुविधा उपलब्द आहे, तिथुन on/off करणाऱ्या कामगार बंधु भगिनींना या सेवेचा निश्चित लाभ होइल.

  

आपला,
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई,WOU.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

“May the teachings of Lord Mahavir inspire us to lead a life of compassion, non-violence, and righteousness.

Wishing you and your loved ones a blessed Mahavir Jayanti filled with peace, harmony, and spiritual enlightenment.”

🙏🚩Team PEU 🚩🙏

रु.४०,०००/- पेक्षा कमी बेसीक असलेल्या कामगार बंधु / भगिनींना अर्धाच CPP मिळत होता, Petroleum Employees Union ने हा कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवुन कामगारांना आर्थिक लाभ मिळवून दिला, त्या बाबत अनेकांनी मनापासून PEU चे आभार व्यक्त केले , त्यातील काही आभारपत्रे:

For awareness of all:

ऑफशोअर मधील कामगारांकरिता महत्त्वाची सूचना!!

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑफशोअर करिता CREW BOAT द्वारे पॅसेंजर वाहतूक सुरुवात ONGC कडून करण्यात आली आहे, परंतु सदर व्यवस्था ही CONTRACTUAL WORKFORCE करिता असून ओएनजीसी एम्प्लॉइज करिता नाही आणि ONGC एम्प्लॉइज करिता कोणतीही अधिकृत चर्चा पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर करण्यात आलेली नाही.

ONGC EMPLOYEES करिता अश्या TRANSPORTATION करिता पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियनचा ठाम विरोध आहे आणि सर्व एम्प्लॉइज ना विनंती आहे की आपण कोणीही कोणत्याही दबाव अथवा भूलथापांना बळी पडू नये आणि आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम ठेवू आणि पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन बरोबर खंबीरपणे उभे राहावे.

संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई, WOU.

🚩🙏 धन्यवाद 🙏🚩

🙏बंधू आणि भगिनींनो,🙏

ऑफशोअर मध्ये कार्यरत असलेल्या व महाराष्ट्राच्या विविध भागातून ऑफशोअर ड्यूटी करिता जाणाऱ्या बांधवांकरिता आपल्या दी.१०/१०/२०२३ व ०१/११/२०२३ रोजी च्या पत्रा अन्वये हेलिबेस येथे फ्रेश अप- चेंजींग रूम तसेच हेलिबेस येथे reporting नंतर उशिरा Sortie असल्यामुळे हेलिबेस येथे थांबून ऑफशोअर ला गेल्यावर नाईट शिफ्ट जॉईन करणाऱ्या बंधू आणि भगिनींना हेलीबेस येथे रेस्ट रूम करिता सुविधा उपलब्ध करण्याकरिता आपण मागणी केली होती व त्यानंतरही सतत त्याचा पाठपुरावा चालू ठेवला होता, ज्याची पूर्तता व्हायला सुरुवात झाली असून अस्थपणेने प्राथमिक स्वरूपात हेलिबेस येथे टीव्ही जवळ रूम क्रमांक.२ येथे तात्पुरते फ्रेश अप व चेंजिंग सुविधा सुरू केली आहे, तसेच आज आपले जनरल सेक्रेटरी श्री.संतोष पाटील साहेब व DGS. श्री संदीप रेवंडकर साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांसह भेट देऊन सध्या दिलेल्या सुविधे मध्ये काही बदल करण्याकरिता सूचना दिल्या असून सदर तात्पुरते स्वरूपाची सुविधा ही अजुन चांगली करून सुचविलेल्या नवीन ठिकाणी सुसज्ज स्वरूपात करण्या बाबत चर्चा केली व अस्थापनेकडून देखील ते मान्य करण्यात आले आहे.

ही सुविधा देखील लवकरच सुरू करण्याचे मान्य केले आहे.

🚩आपले पाठबळ हीच ताकत !!!🚩

आपला,
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन, मुंबई,WOU.


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Dear Blood Donors,

On behalf of the Petroleum Employees Union, Uran Unit, and ONGC Uran Plant Management, We extend our deepest gratitude to each and every one of the 675 blood donors who generously responded to our invitation for the Mega Blood Donation Camp on Friday, March 22, 2024, at Dronagiri Bhavan Multipurpose Shed, Uran Plant.

Your overwhelming response is truly heartening and reaffirms our faith in the kindness and generosity of our community. Your selfless act will undoubtedly make a significant difference in the lives of those in need.

Thank you for embodying the spirit of compassion and giving. Your contribution is invaluable, and we are immensely grateful for your support.

With sincere Thanks… 🚩Team PEU Uran Plant & Trombay Terminal 🚩

प्रिय बंधू आणि भगिनींनो..!💐

काही दिवसांपूर्वी आपल्या ऑफ़शोर मध्ये कार्यरत असलेले रिग वरील एम्प्लॉईज यांच्या वतीने पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनकडे त्यांना जिममध्ये आवश्यक असलेल्या वस्तू उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली होती.

सदर बाबीचा पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून गंभीरपणे पाठपुरावा करण्यात आला व कामगारांच्या मागणी नुसार सर्व रिगवरील जिममध्ये पाहिजे असलेल्या वस्तू, पाठपुरावा करून मिळवल्या. सदर वस्तू न्हावा सप्लाय बेस येथे असून कामगारांनी मागणी केलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू येत्या ८ ते १० दिवसांत प्रत्येक रिग वर उपलब्ध होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी..!

संतोष ज. पाटील.
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
डब्लू.ओ.यु,ओएनजीसी,मुंबई🚩🚩

✌️✌️🚩वचनपुर्ती🚩✌️✌️

प्रिय बंधू आणि भगिनींनो💐,

४००००/- पेक्षा कमी बेसिक असलेल्यांना फक्त अर्धाच CPP मिळत होता.

पूर्ण CPP न मिळाल्याने आपल्या ऑफ़शोरच्या कामगार बंधू आणि भगिनींचं बऱ्यापैकी नुकसान होऊन आर्थिक झळ बसत होती.

कामगारांचे एवढे आर्थिक नुकसान होत असतानाही तत्कालीन मान्यताप्राप्त युनियन ने याबाबत काहीही केले नाही.

निवडणुकीपुर्वी PEU ने घेतलेल्या V.C. मध्ये जेव्हा हा मुद्दा विचारण्यात आला , तेव्हा PEU च्या General secretary श्री. संतोष पाटील साहेबांनी घोषणा केली होती की,
” यंदाच्या निवडणुकीत PEU मान्यताप्राप्त झाल्यास ६ महिन्यात CPP साठी बेसिक चे बंधन हटविण्यात येइल, आणि सर्वांस पुर्ण CPP मिळेल.”

आपण CPP बाबतीत 40,000 बेसिक पे चं बंधन नसले पाहिजेत म्हणून व्यवस्थापनापुढे मोठ्या ताकदीने हा ज्वलंत मुद्दा ठेवला व त्याची फोड करून सांगितलं की, कशाप्रकारे कामगार बंधू आणि भगिनी पूर्ण CPP घेण्यास पात्र आहेत त्यांना सोसावी लागत असलेली आर्थिक झळ व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली.

PEU ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे आणि त्यानुसार offshore मध्ये काम करणाऱ्या सर्वाना पूर्ण CPP मिळेल व त्यासाठी कोणत्याही बेसिक पे चे बंधन नसणार आहे.

दि.२५.०१.२४ पासुन PEU मान्यता प्राप्त झाली आहे , आणि दिलेल्या वचनानुसार ६ महिन्यांच्या आतच कामगारांच्या सदर समस्येचे यशस्वीरित्या निराकरण केले आहे.


  • संतोष ज. पाटील
    जनरल सेक्रेटरी
    पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
    डब्लू.ओ.यु, ओ.एन.जी.सी,मुंबई🚩🚩

प्रिय कामगार बंधू आणि भगिनींनो💐

आपणास माहीतच आहे की, आपल्या युनियनने मान्यताप्राप्तीच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा असा विजय मिळवला आहे. “काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले मान्यताप्राप्तीच्या पुष्टीकरणाचे पत्र(Recognition Letter) मा. कामगार मंत्रालयाच्या स्वाक्षरी सहीत आज दिनांक. २४.०१.२०२४ रोजी आपल्याला प्राप्त झाले आहे” हा आपल्या सर्वांकरीता आनंदाचा क्षण आहे. हा विजय युनियनमधील आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्न, मेहनत आणि समर्पणाचे फळ आहे. या यशाच्या निमित्ताने आपण सर्व, कामगारांच्या हितासाठी एकत्रित येऊन मजबूत रित्या काम करण्याचा संकल्प करू.

मान्यताप्राप्ती बाबत आपल्या कडे कामगार कायद्यानुसार २ वर्षे व ओ.एन.जी.सी च्या पॉलिसी नुसार १ वर्ष (२+१)असे मिळून तीन वर्षे आपल्याला कामगार हितासाठी काम करायला मिळणार आहेत.

कामगाराच्या कल्याण व सर्वोतोपरी हिताच्या मोहिमेत आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आणि सहकार्य असेच भेटत राहो जेणेकरून आपल्या युनियनची ताकद वाढेल व पुढील येणाऱ्या सर्व अडचणींवर आपण संघटीतपणे मात करू व यश संपादन करू. मिळवलेल्या यशाबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार.

धन्यवाद…🙏🏻

संतोष ज. पाटील
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
ओ.एन.जी.सी, मुंबई.🚩🚩